Breaking News

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि. 8) निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र व वकील महेश जेठमलानी आणि अमेरिकेत राहणारी मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या दुसर्‍या कन्येचे यापूर्वीच निधन झाले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये जेठमलानी यांची गणना होत असे. त्यांनी बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषविले होते. त्यांच्या निधनाने कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनामुळे भारताने असाधारण वकील गमावला आहे. आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी ते कायम आठवणीत राहतील.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply