Breaking News

माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर

पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष

पेण : प्रतिनिधी

पेण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, महासंग्राम, रयत क्रांती मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी मंगळवारी (दि. 1) जाहीर झाली. भाजपच्या  पहिल्या यादीतच रविशेठ पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके लावून एकच जल्लोष केला.

संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघात तसेच शहरात करोडो रुपयांची विकासकामे करणारे व दांडगा जनसंपर्क असणार्‍या रविशेठ पाटील यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य संचारले असून, त्यांनी जल्लोष करून रविशेठ पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. विधानसभा निवडणुकीत रविशेठ पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पेणमधून रविशेठ पाटील यांना निवडून आणणारच -वडखळ सरपंच राजेश मोकल यांची ग्वाही

पेण : प्रतिनिधी

पेण, सुधागड विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे भाजपचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात जोरात सुरू झाला असून, या निवडणुकीत रविशेठ पाटील यांना खारेपाट विभागातून म्हणजेच वडखळ, शिर्की, बोरी, बोर्वे ग्रामपंचायतींमधून सात हजारांचे मताधिक्य देणार, अशी ग्वाही वडखळचे सरपंच राजेश मोकल यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

पेण खारेपाट विभागात पाण्याचा प्रश्न अतिशय गहन होता.  येथील शेकाप आमदाराने वारंवार आश्वासने देऊनही येथील पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनतेचे मोठे हाल या ठिकाणी पाहावयाला मिळाले, मात्र माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून खारेपाट विभागातील पाण्याचा प्रश्न सोडविला आहे, तसेच त्यांनी या विभागात अनेक विकासकामे केली आहेत, असे सांगून सरपंच राजेश मोकल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत रविशेठ पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत …

Leave a Reply