माणगांव : प्रतिनिधी
तालुक्यातील सणसवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने पाच लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी 4 ते 25 मे रोजी सायंकायळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली.
राजेंद्र बाबासाहेब नलावडे (वय 62) यांच्या सणसवाडी (ता. माणगांव) येथील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून, अज्ञात चोरट्यांनी घरातील एक लाख 40हजार रुपयांच्या चलनी नोटा, आणि पाच लाख 50हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख 90 हजार रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केला.
या प्रकरणी राजेंद्र नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माणगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगळे करीत आहेत.