पनवेल : रामप्रहर वृत्त
टीआयपीएल रोटरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) कळंबोलीतील माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानात झाले.
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून यंदाचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी इंडिया डोंबिवली रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मिलिंद मोहिते, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे शैलेश पोटे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव, डॉ. आमोद दिवेकर, बीकेसी संघाचे मालक भाऊ कोकणे, कर्णधार अविनाश बारणे यांच्यासह अनेक मान्यवर, रोटरीचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धा 10 ते 12 जानेवारी आणि 17 ते 19 जानेवारीदरम्यान कळंबोलीतील माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत रोटरी 3131 प्रांतातील 40 वर्षावरील 78 सदस्य हे खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत. ते 78 सदस्य सहा विविध संघात प्रत्येकी 13 खेळाडू धर्तीवर लिलाव पद्धतीने निवडले गेले आहेत.
रायगड रोटरी वॉरियर्स हे या स्पर्धेचे आयोजक असून टीआयपीएल मुख्य प्रायोजक, तर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी हे सहप्रयोजक आहेत. स्पर्धेची जबाबदारी अध्यक्ष गणेश कडू, सचिव डॉ. संतोष जाधव आणि अतिश थोरात यांच्याकडे आहे.
Check Also
आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …