Breaking News

कौन है समझदार…

’कौन है समझदार’ डिसेंबेरच्या पहिल्या आठवड्यात पनवेल परिसरात तहलका माजवला असे म्हणायला हरकत नाही. जगात डिसेंबेरचा पहिला आठवडा एचआयव्ही / एड्स साथीची समाप्ती: समुदायानुसार समुदाय  या घोष वाक्याने एडस सप्ताह म्हणून पाळण्यात आला. रायगड मध्ये  लोकपरिषद ,आश्रय सोशल फौउंडेशन, रोटरी क्लब आणि अनेक सामाजिक संस्था एच.आय.व्हीच्या जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत. एडस सप्ताह निमित्त पनवेल मध्ये विविध कार्यक्रम या संस्था  तर्फे राबविण्यात आले. आश्रय फौंडेशन आणि लोकपरिषद यांनी  ’ कौन है समझदार ’ या पथ नाट्याद्वारे पनवेल  परिसरात एड्स बाबत जन जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे 

रायगड जिल्ह्यात पनवेल आणि आजूबाजूचा परिसरात जागेला आलेली सोन्याची किमत त्यामुळे अनेकांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेले लेडीज बार त्याची साक्ष देत आहेत.तरूण पिढी त्याच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या भागात एच.आय.व्ही बाधित रुग्ण सापडत आहेत. यासाठी  सुरक्षित लैंगिक समबंधा बाबत जन जागृती  करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.   पनवेल तालुक्यातील अनेक  गावात लोकपरिषद आणि आश्रय सोशल फौउंडेशनच्या समाज सेविका ’ कौन है समझदार ’  पथ नाट्य सादर करीत असताना . गावातील नागरिक ते  थांबून पाहत होते. त्यातून  एच.आय.व्ही. बाबत दिली जाणारी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. त्यामुळे एड्स बद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सामन्य माणसाच्या मनात निर्माण झालेली  दिसून येत होती. त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या पथ नाटयातून त्यांना मिळालेली त्यांच्या चेहर्यावरून दिसून येत  होते . 

भारतात   2.1  दशलक्ष एचआयव्ही ग्रस्त  रुग्ण असल्याने  भारत  जगात  तिसर्या क्रमांकावर आहे.  पण आता देशात त्याचे प्रमाण  एड्स कमी होत आहे. 2016  नंतर  एड्स-संबंधित मृत्यू अर्ध्यापेक्षा जास्त घटले आहे  2017 मध्ये, नवीन संक्रमण 80,000 वरून 88,000 पर्यंत वाढले त्यामध्ये बहुतेक पुरुष होते.  नवीन संक्रमण पुरुष 50,000 स्त्रिया 34,000  आणि मुलांमध्ये 3,700 (0-14 वर्षे वयोगटातील) आहे  आणि  एड्स संबंधित मृत्यू 62,000 वरुन 69,000 पर्यंत वाढल्याचा अहवाल आहे. तरीही  शेजारच्या देशांच्या तुलनेत  भारताने नवीन एचआयव्ही संसर्ग अर्ध्याने कमी करण्याची प्रगती केली आहे. या यशाचे प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाद्वारे भारत सरकारने  पुरुष, लैंगिक कामगार आणि मादक पदार्थांचे इंजेक्शन देणार्या  उच्च-जोखमीच्या गटांना लक्ष्य केल्याने  विशेष प्रभावी ठरली आहे  2012  पूर्वी, भारतातील एचआयव्ही साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा कार्यक्रम  आंतरराष्ट्रीय निधीवर खूप अवलंबून होता.आता भारतात एचआयव्ही आणि एड्स कार्यक्रमांना उपलब्ध निधीच्या 90% पेक्षा जास्त देशांतर्गत निधी उपलब्ध होत आहे हे सुध्दा त्यामागचे कारण असू शकते 

एड्स  हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे.प्रतिकार शक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोग लक्षणांचा समूह म्हणजे एडस होय. 1981 मध्ये या आजाराची ओळख झाली. आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात  एच.आय.व्ही. विषाणू सापडला आणि तेथून हा जगात  पसरला असे मानले जाते. यामध्ये माणसाची प्रतिकारशक्ती निकामी होते. या रोगाने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षे काहीही लक्षणांशिवाय  राहू शकते. भारतात 1986 मध्ये चेन्नईत  एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह व्यक्तीचे निदान झाले. त्यानंतर मुंबईत पहिला रुग्ण सापडला.  जगात एडस  रूग्णांच्या संखेत तिसर्या क्रमांक भारताचा होता. शासनस्तरावर केलेली जनजागृती आणि विविध स्तरावर केलेल्या उपाया योजनांमुळे एडस रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे.

1 डिसेंबर हा दिवस जगात 1988 पासून जागतिक एडस  जन जागृती   दिन म्हणून पाळला जातो. ऑगस्ट 1987 मध्ये जेम्स ड्ब्ल्यु बेन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या जिनेवहा येथे झालेल्या जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली. डॉक्टर जॉनथन मान  (एड्स ग्लोबलचे संचालक) यांच्या सहमति नंतर 1 डिसेंबर 1988 पासून जागतिक एड्स दिवस पाळला जातो . वैद्यकीय शास्त्रामध्ये एचआयव्हीवरील उपचार आढळले आणि भेदभावाविरूद्ध लढा देण्यासाठी आणि योग्य उपचारांसह एचआयव्ही रूग्णांच्या संरक्षणासाठी विविध सूत्रे देखील घेण्यात आली आहेत. तरीही, एचआयव्हीचे लाखो रुग्ण आहेत, ज्यांना अद्याप एचआयव्हीची चाचण्या, उपचार आणि औषधे उपलब्ध नाहीत. एचआयव्ही अस्तित्त्वात असलेल्या सर्वांसाठी म्हणून 1 डिसेंबर हा एड्स  दिवस पाळणे महत्वाचे आहे हा दिवस एक स्मरणपत्र म्हणून कार्य करतो. एड्स संपविण्यासाठी आपण एकत्रित लढायला पाहिजे. यावर्षी जागतिक एड्स दिन 2019 ची थीम एचआयव्ही/एड्स साथीची समाप्ती  समुदायानुसार समुदाय आहे. जागतिक एड्स दिन एचआयव्हीविरूद्ध लढण्याची संधी देतो. एचआयव्हीने बाधित झालेल्या लोकांना जीवघेण्या आजाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत असतो . 

आपल्या देशात ही हा रोग मोठ्या प्रमाणात पसरल्याने केंद्र शासन, वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन व राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हा कार्यक्रम देशात सर्वच स्तरावर राबवला जातो. महाराष्ट्रात म.रा.ए.नि.सो. मुंबई यांच्या अधिपत्याखाली रुग्णालये, आयोजित शिबीरे ,फिरते मोबाईल शिबिरात एच.आय.व्ही चाचणी मोफत केली जाते. आणि रिपोर्ट बाबत गुप्तता पाळली जाते यामध्ये जाऊन स्वत:हून चाचणी करून घेणे महत्वाचे आहे. ज्यामुळे  आपली स्थिति जाणून घेता येईल. त्यामुळे भारत एड्स मुक्त होण्यास मदत होईल. या सप्ताहात लोकपरिषद आणि आश्रय फौंडेशनने रॅली काढून एच.आय.व्ही. वर आधारित घोषणा देऊन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.

आर.टी ओ कार्यालय, ग्रेट भारत सर्कस, आशा की किरण या नशा मुक्ति केंद्रात आणि तुर्भे येथील रेड लाईट एरियात जाऊन महिलांची रक्त तपासणी केली  लोकपरिषदेचे अध्यक्ष अशोक गायकवाड, संचालक विमल गायकवाड, उर्मिला यादव,शिल्पा हलनकर,मनीषा पवार,जयश्री जाधव, करण निकम ,कल्पना ठोकल, अश्विनी लोंढे, संजीवनी सावंत, रुकया बारगीर, दिक्षिता गावंड, मिनल मोहिते, सागर पवार आणि डॉक्टर कुरकुटे  यांनी सहभाग घेऊन या सप्ताहात जनजागृतीचे कार्य केलेच पण पनवेल परिसरात अनेक वर्षे महाविद्यालये, ट्रक टर्मिनल, लेडीज बार, स्ट्रीट गर्लस आणि रेड लाईट एरिया मध्ये जाऊन एड्स बाबत जागृती करण्याचे महत्वाचे कार्य ही मंडळी करीत आहेत.

-नितीन देशमुख

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply