Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लवकरच

डायलिसिसची सुविधा

पनवेल : बातमीदार

काही महिन्यांपूर्वी पनवेलमध्ये सुरू झालेल्या पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी डायलिसिसची सुविधा सुरू होणार आहे, तसेच आयसीसीयू सेंटर देखील उपलब्ध होणार आहे. या सुविधा सुरू होणार असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत कमी दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. नऊ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनी सुरू झालेल्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच स्त्री रोगतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांनी आता रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या इमारतीत दुसर्‍या माळ्यावर अत्याधुनिक सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. आठ खाटांचे डायलिस सेंटर व सहा खाटांचे मॉड्युलर आयसीसीयू सेंटर असणार आहे. महाराष्ट्रातील मोजक्याच उपजिल्हा रुग्णालयात दिली जाणारी ही सुविधा पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहे. मेडिकल गॅस पाइपलाइन, चांगल्या दर्जाची फ्लोरिंग, एअर हँडलिंग युनिट, डायलिसिस मशीन, व्हेन्टीलेटर रूम, विलगीकरण कक्ष आदींचा समावेश यामध्ये आहे. प्रत्येकी चार तासाला एक डायलिसिस होणार आहे. आठ खाटांवर प्रत्येकी चार विविध डायलिसिस रुग्णांना सेंटरचा लाभ घेता येणार आहे.

डायलिसिस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी सुविधा आपल्या रुग्णालयात नव्हती. येत्या महिनाभरात पनवेलमधील रुग्णांना पनवेलमध्ये डायलिसिसची सुविधा वाजवी दरात मिळणार आहे.

-डॉ. नागनाथ यम्पल्ले, वैद्यकीय अधीक्षक

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply