Breaking News

सायबर फसवणूक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते -शिरीष पवार

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

खालापूर : प्रतिनिधी

सायबर फसवणूक एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मात्र सतर्क राहिल्यास ऑनलाइनच्या माध्यमातून लालसेपोटी होणारी फसवणूक व अनोळखी माध्यमातून होत असणारे नुकसान टाळता येते, असे प्रतिपादन खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी गुरुवारी (दि. 17) येथे केले.सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली परिसरातील शाळांमध्ये लैंगिक शिक्षण व सायबर क्राईम या विषयावर सातत्यपुर्ण मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनच्या वतीने खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात गुरूवारी विद्यार्थी व शिक्षकांसाठी सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. आभासी विश्वात न राहता सतर्क राहून काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. शिरीष पवार यांनी या वेळी विद्यार्थी व शिक्षकांबरोबर संवाद साधून त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले. छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन पाटील, तसेच ज्ञानदेव बिचकर, यादव गौंडा, दिलीप म्हसे, गणेश सावंत, शिल्पा मांगळे, धनंजय मोहिते, अंकुश कवळे, साबिया खान, लक्ष्मी माने, शुभांगी पाटील, किरण भंडारी यांच्यासह शिक्षक,  कर्मचारी व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, संघटक नीलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply