Breaking News

अश्विनी मयेकरला पॉवर लिफ्टिंमध्ये सुवर्णपदक

अलिबाग ः प्रतिनिधी

बिहार राज्यातील पटना येथे अखिल भारतीय नागरी सेवा पॉवर लिफटींग स्पर्धा 4 ते 8 मार्च या कालावधीत पार पडली. या

स्पर्धेत पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता अशोक मयेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. बिहार आणि हरियाणाच्या खेळाडूंना मागे टाकत अंकिता मयेकर यांनी 277 किलो इतके वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. प्रशिक्षक राज नेवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सराव करीत असून रायगड जिल्हा पॉवर लिफटींग असोसिएशनचे सचिव मदन भास्करे, पती विनय पिलणकर, आई अश्विनी, घवाली सर, लीना घाडीगावकर, सदानंद जोशी हे तिचे मार्गदर्शक आहेत. या यशाबद्दल अंकिता यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गुणवत्ताधारक पॉवर लफटींग खेळाडू म्हणून फेब्रुवारी 2019पासून त्या थेट नियुक्तीने रायगड जिल्ह्यात पेण तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply