Breaking News

रायगड जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष

अलिबाग : जिमाका

शासनाने कोरोना विषाणूचा (केव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आलेला आहे. त्याबाबतची उपोद्घातातील अ. क्र. 1 अन्वये अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग टाळणेकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी रायगड जिल्ह्यात खालीलप्रमाणे स्वतंत्र विलगीकरण कक्ष (र्टीीरपींळपश उशश्रश्र) स्थापन करण्यात आले आहेत. अलिबाग-सारंग विश्रमागृह अलिबाग-24 बेड, पनवेल-ग्रामविकास भवन खारघर-200 बेड, पेण-उंबरडे रेस्ट हाऊस-20 बेड, मुरुड-रेस्ट हाऊस-10 बेड, कर्जत-रीव्हगेट रिसॉर्ट व इतर-15 बेड, खालापूर-जिल्हा परिषद रेस्ट हाऊस (4 बेड) सार्वजनिक बांधकाम रेस्ट हाऊस (5 बेड)-9 बेड, माणगांव-सार्वजनिक बांधकाम रेस्ट हाऊस-4 बेड, तळा- पीएचसी महागाव-15 बेड, उरण-केर पाँईट हॉस्पीटल(बंद)-40 बेड, सुधागड-हॉटेल शांगरीला-40 बेड, महाड-प्राईड इंडिया महाड-15 बेड, रोहा-पीएचसी नागोठणे ट्रेनिंग हॉल-10 बेड, पोलादपूर-रेस्ट हाऊस-15 बेड, म्हसळा-दुर्गावती शाळा (10 बेड), व रेस्ट हाऊस (5 बेड)-15 बेड अशी एकूण 442 बेडची संख्या आहे. या स्वतंत्र विलगीकरण कक्षाशी संबंधीत खालीलप्रमाणे अधिकारी यांनी त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या जबाबदार्‍या आहेत.

* तहसिलदार- स्वतंत्र कक्षाची जागा निश्चित करणे, पायाभुत सुविधा पुरविणे. पोलिसांच्या मदतीने कक्षात नागरिकांना दाखल करुन घेणे.

* वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी- स्वतंत्र कक्षात नागरिकांना पोलिसांच्या मदतीने दाखल करण्यासाठी अ‍ॅब्युलन्सची व्यवस्था करणे, नागरीक दाखल झाल्यावर तपासणी करणे, त्यांची वैद्यकीय स्थिती करण्याचे मॉनेटर करणे, आवश्यकतेप्रमाणे विसरोलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी नमुने पाठवणे, वैद्यकिय मदत पुरवणे, स्थितीप्रमाणे नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करणे, आवश्यकतेनुसार वैद्यकीय कर्मचारी ठेवणे.

* गटविकास अधिकारी व आरोग्य विस्तार अधिकारी- स्वतंत्र कक्षाबाहेर राहून वैद्यकीय कर्मचारीमार्फत नागरिकांना जेवणाची, चहा, पाण्याची, नाष्टाची व्यवस्था करणे तसेच अन्य दैनंदिन गरजेच्या सोयी सुविधा पुरविणे.

* मुख्याधिकारी, नगरपालिका, नगरपंचायत व त्यांनी नेमलेले कर्मचारी- स्वतंत्र कक्षात नागरिकांना स्वच्छतेसाठी साहित्य पुरविणे. स्वतंत्र कक्षात  निर्माण झालेल्या कचर्‍याची वैद्यकीय पध्दतीने विल्हेवाट लावणे.

* पोलीस अधिकारी व कर्मचारी- स्वतंत्र कक्षात नागरिकांना आणणे, दाखल करुन घेणे, स्वतंत्र कक्षाला सुरक्षा व्यवस्था पुरविणे, स्वतंत्र कक्षातून नागरिक बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेणे तसेच बाहेरील अन्य व्यक्ती अथवा नातेवाईक कक्षातील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्कात येणार नाहीत यांची दक्षता घेणे. आवश्यकता असल्यास, भारतीय दंड संहिता, कलम 188 अंतर्गत कारवाई करणे.

* उपविभागीय अधिकारी (महसूल)-वरीलप्रमाणे सर्व कामकाजावर पर्यवेक्षण व संनियंत्रण ठेवणे. उपरोक्त नमुद सर्व अधिकारी यांची आपल्या स्तरावरुन तालुका अधिकारी व ग्रामिण रुग्णालय यांच्याशी सल्लामसलत करुन वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती स्वतंत्र कक्षासाठी करणे. सुरक्षतेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश निर्गमीत करणे. इतर आवश्यक कर्मचारी अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश निर्गमीत करणे.  स्वतंत्र कक्षातील परिस्थितीचा दररोज जिल्हा नियंत्रण कक्षाला अहवाल सादर करणे.

* सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल), सर्व तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी- स्वतंत्र कक्ष, विलगीकरण कक्षासाठी पर्याप्त पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज उपलब्ध करुन घेणे. पर्याप्त औषधांची मात्रा आपल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध राहिल यासाठी उपाययोजना करणे. रुग्णांसाठी पर्याप्त ऑक्सीजन सिलेंडर व व्हेटिलेटर्स उपलब्ध राहतील असे नियोजन करणे यासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसायकांची मदत घेणे.

 आपल्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय कर्मचारी व कोरोना संबंधित काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रशिक्षण घेणे. औषधांचा सॅनिटायझर, माक्स यांचे साठेबाजी व काळाबाजार अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने रोखणे. स्वतंत्र कक्षामधील बरे झालेले रुग्ण यांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार बाहेर काढून घरी पोचविणे. एनजीओ, हेल्थ ग्रुप, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांचे आपल्या कार्यक्षेत्रात कोरोना व्हायरस ग्रुप तयार करुन त्यांची कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्ष मदत व सेवा घेणे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. वरील आदेशानुसार कार्यवाही न केल्यास, त्यांचे विरुध्द भारतीय दंड संहिता, 1960चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply