Breaking News

डॉ. डी. वाय. पाटील इमारतीला आग

साहित्य जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ इमारतीला बुधवारी (दि. 18) दुपारी 12च्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या प्लायवूड व थर्माकोलच्या साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ह्या आगीत साहित्य संपूर्ण जाळून झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी डॉ. डी. वाय. पाटील परिसरातून धुराचे लोट येऊ लागतात परिसरात घबराट पसरली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या आग विझवण्यात प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.डॉ. डी. वाय. पाटील प्रशासनान आपल्या परिसरात नवीन इमारत बांधण्यास सुरुवात केली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य आणले गेले असून या समानाला ही आग लागल्याचे बोलले जाते. मुख्य म्हणजे या ठिकाणी थर्माकॉल जास्त प्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाल्याचे आढळून आले आहे. या आगीची तीव्रता जास्त होती. मात्र आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मुख्य म्हणजे या इमारती शेजारी स्टेडियम व मुलींचे वसतिगृह आहेत. आगीचा भडका उडून ती पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने काळजी घेत ही आग आटोक्यात आणली.

बंदी असतानाही थर्माकोलचा साठा!

डॉ. डी. वाय पाटील कॅम्पसमध्ये नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. चौथ्या मजल्यावर थर्माकोल व प्लायवुड असे साहित्य होते. त्या साहित्याला अचानक आग लागल्याने ती पसरली. मात्र राज्यभरात प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी असताना, हा थर्माकोलचा साठा या ठिकाणी आला कसा? जर बंदी असताना हा साठा आणला गेला असल्यास त्यावर पालिका काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

डॉ. डी. वाय. पाटील येथे चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत थर्माकोलमुळे लागली असल्यास त्याबद्दलची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी अग्निशमन दलाचे मुख्याधिकारी शिरीष अरादवाड यांना सांगितले आहे. त्याची तपासणी केली जाईल. कदाचित या मजल्यावर उभा संस्थेकडून काही मशीनरीज आणण्याचे काम सुरू होते, त्या मशीनरिजला पॅकिंगसाठी थर्माकोल लागतो. हा थर्माकोल त्यामुळे साठलेला असावा. त्याबाबत चौकशी करून मगच कारवाई करायची की नाही तो निर्णय घेतला जाईल.

-सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply