Breaking News

नवी मुंबईत खाडीकिनारी फ्लेमिंगोंचा संचार

नवी मुंबई : बातमीदार

जगभरात व देशात सध्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला संजीवनी प्राप्त झाली आहे. नवी मुंबईत देखील याचे सुखद परिणाम दिसू लागले असून कधी नव्हे ती फ्लेमिंगो पक्षांची संख्या वाढली आहे. कच्छच्या रणातून आलेल्या फ्लेमिंगो पक्षांमुळे  ठाणे खाडीला, ऐरोली खाडी, सिवूडस एन आर आय कॉम्प्लेक्स, व टी एस चाणक्यशेजारी असलेले होल्डिंग पौंडवर गुलाबी चादर पांघरल्याचा भास होऊ

लागला आहे.

नवी मुंबईतील खाडी किनारे हे फ्लेमिंगो पक्षांचे आवडते ठिकाण. फ्लेमिंगो पक्षी हे  जुलै व सप्टेंबर हे दोन महिने विणीचा हंगाम आटपून कच्छच्या रणातुन नवी मुंबईत येतात. 10 महिने, मुंबई शिवडी, ठाणे व नवी मुंबईत त्यांचा अधिवास असतो. त्यांनंतर पून्हा कच्छच्या रणाकडे पुनर्वप्रस्थान करतात. त्या प्रमाणे सध्या हे फ्लेमिंगो नवी मुंबईत पाहायला मिळत आहेत. त्यात ठाणे खाडीत होत असलेल्या भरती व ओहोटीचे निसर्गाचे वेळापत्रक पळत आपल्या खाद्याच्या शोधात हे पक्षी नवी मुंबईत आलेले आहेत.

सिवूडस एनआरआय कॉम्प्लेक्स व टी एस चाणक्य येथी होल्डिंग पौंडवर गुलाबी रंगाचे पक्षी मनमोहून टाकत आहेत.लॉकडाऊनमुळे शुद्ध वातावरणाचा सकारात्मक परिणाम करणी असल्याचे प्राणीमित्र सांगतात. त्यामुळे लाखोंच्या संख्येत गुलाबी रंगाची छटा असलेले फ्लेमिंगो नवी मुंबईत दिसू लागले आहेत. लालबुंद चोच, लांबसडक मान व पंख उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते.  लॉकडाऊन म्हणजे ही पर्यावरण जपण्याचा जणू संदेश पृथ्वीने मनुष्याला दिला आहे. जर कांदळवने नष्ट झाल्यास फ्लेमिंगोचा अधिवास क्षेत्र नष्ट होऊन नवी मुंबईकर फ्लेमिंगो पक्षांच्या सुखद भेटीला मूकतील अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. सागरी जिवांसोबत, शेवाळे व कांदळवनासोबत वाढणारी आणखी एकच वनस्पती हे फ्लेमिंगोचे खाद्य असल्याने व  नवी मुंबईत ते पूरक असल्याने हे पक्षी दरवर्षी आपली भूक भगवण्यासाठी नवी मुंबईत येतात. यंदा त्यात वाढ झाली आहे. 

शास्त्रज्ञ, पर्यावरण अभ्यासकांनी व सामाजिक संस्थांनी एकत्र येत या लॉकडाऊन संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. निसर्गाकडून मानवाला मिळणार्‍या प्रत्येक बाबीची लॉकडाऊन आधीची व लॉकडाऊनमध्ये किती सकारात्मक परिणाम झाला याची आकडेवारी जाहिर करणे गरजेचे आहे. तरच फ्लेमिंगो पक्षांसारखे जगप्रसिद्ध पक्षांचा अधिवास जपण्यास नवी मुंबईत मदत होईल. त्यासाठी नवी मुंबईचे खाडी किनारे प्रदूषण व डेब्रिज मुक्त ठेवणे गरजेचे आहे. तर निसर्गाची साखळी जिवंत राहील.

– सागर म्हात्रे, वन्यजीव अभ्यासक, प्राणी व पक्षी मित्र व छायाचित्रकार

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply