Breaking News

कर्जतमध्ये 57 ठिकाणी आंदोलन

कर्जत : बातमीदार

राज्यात सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या धोरणांमुळे कोरोनावर मात करण्यात अपयश आले आहे, त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार कर्जत तालुक्यात शहरात आणि 38 गावात तब्बल 57 ठिकाणी काळे कपडे आणि काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.

कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर,जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, महिला तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, यांच्या नेतृत्वाखाली कर्जत, नेरळ, माथेरान या शहरात आणि ग्रामीण भागात भाजपकडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. कर्जत शहरात उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने आणि शहर अध्यक्ष दिनेश सोळंकी यांच्या सह विविध पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून राज्य सरकारचा निषेध केला. माथेरान शहरात शहर अध्यक्ष विलास पाटील यांनी तर नेरळ शहरात तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, शहर अध्यक्ष अनिल जैन, प्रवीण पोलकम, नितीन कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध ठिकाणी एकत्र येत राज्य सरकारचा निषेध केला. त्याचवेळी कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद प्रभागातील 12 पंचायत समिती गणामध्ये मिळून 38 ठिकाणी जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, पंकज पाटील, तसेच युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, केशव तरे, जीवन मोडक, दिनेश रसाळ, रवि मसणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply