Breaking News

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिडकोचेउपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना शनिवारी (दि. 30) दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, परिवहन व संसदीय कार्ये मंत्री अनिल परब, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आदींनी उपस्थिती लाभली.

कोविड काळात डॉ. संजय मुखर्जी हे कृती दलाचेही (टास्क फोर्स) ते सदस्य होते. या विभागातर्फे राज्यात विशेष कोविड कक्ष, अतिदक्षता विभाग आणि विलगीकरण खाटा या सुविधांसह सज्ज असलेली 19 कोविड समर्पित रुग्णालये स्थापन करण्यात आली. प्लॅन्टा या जगातील सर्वांत मोठ्या रक्त द्रव उपचार पद्धती (प्लाझ्मा थेरपी) चाचणी प्रकल्पाच्या उभारणीकरिता डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेतला.    

या कार्यक्रमाची अनमास्किंग हॅपीनेस विथ मास्क ही संकल्पना होती. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या अन्य कोविड योद्ध्यांनाही सन्मानित करण्यात आले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply