Breaking News

विक्रांत पाटील यांच्याकडून प्रभागातील प्रलंबित कामे पूर्ण

पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करणारे प्रभाग 18 चे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रभागातील विविध समस्या निकाली काढण्याचा धडाकाच लावला आहे.  

नेहमी प्रभागाच्या सेवेसाठी तत्पर असणार्‍या विक्रांत पाटील यांनी स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रिटीकरणमुळे वाढलेल्या उंची मुळे गोविंद गार्डन, गोविंद निलायम आणि अक्षय बंगलो येथील नागरिकांना असुविधा होत होती. हे कांम प्रलंबित राहल्यामुळे विक्रांत पाटील यांनी कॉन्ट्रॅक्टरची कानउघडणी करत काँक्रिट रॅम्प तयार करून घेतले. त्याचप्रमाणे इतर अनेक असुविधांची माहिती घेऊन त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून व योग्य मार्ग काढून ते प्रश्नही निकाली काढले आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply