आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई : बातमीदार – बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरूळ से-19 येथील वंडर्स पार्क क्षेत्रात सायन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्याकरिता 70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच हे सायन्स सेंटर उभारण्याचे काम सुरु होणार असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सूचित केले आहे.
सायन्स सेंटर उभारल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडणार असून नवी मुंबईतील नागरिकांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. आ. म्हात्रे यांच्या दूरदृष्टीतून नवी मुंबईत प्रामुख्याने बेलापूर मतदारसंघात सायन्स सेंटर साकारण्यात यावे, अशी मागणी तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांजकडे करण्यात आली होती. तसेच आयुक्त, तत्कालीन शहर अभियंता व संबंधित अधिकार्यांसह सायन्स सेंटर उभारण्यात येणार्या ठिकाणी दौराही केला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सदर विषयाच्या अनुषंगाने भेट घेतली होती. आपल्या विशेष प्रयत्नाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात सायन्स पार्कची उभारणी होणार असल्याने प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे मत आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केले.