Breaking News

पेण न. प.च्या विविध विषय समिती सभापतींची निवड

पेण : प्रतिनिधी

पेण नगरपरिषदेच्या बांधकाम समिती सभापतीपदी दर्शन बाफना, कर व शुल्क समिती सभापतीपदी सुहास पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी तेजस्विनी नेने, शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा समिती संभापतीपदी राजेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवडणूक मंगळवारी (दि. 15) तहसीलदार तथा पिठासन अधिकारी अरुणा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व  नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. वैशाली संजय कडू या आरोग्य व पथदिप समितीच्या पदसिद्ध सभापती असून स्थायी समितीच्या सदस्यपदी पालिका गटनेते अनिरुद्ध रवींद्र पाटील यांची निवड झालेली आहे. या निवड प्रक्रियेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, सामान्य प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे यांनी सहकार्य केले. नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी नवनिर्वाचित सभापतीचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. या वेळी नगरसेवक निवृत्ती पाटील, प्रशांत ओक, दिपक गुरव, नगरसेविका अश्विनी शहा, नलिनी पवार, शहेनाझ मुजावर, भाजप शहर उपाध्यक्ष अजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply