Breaking News

ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

शंभरी पूर्ण केलेल्या एम. पद्मनाथन यांचा सत्कार

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची तत्परतेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉम या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभागीय संघटनेचे अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी येथे केले.

फेस्कॉमच्या मुंबई प्रादेशिक विभागीय संलग्न असलेल्या दोस्ती एकर्स सिनियर सिटीझन्स क्लबचे सभासद एम. पद्मनाथन यांनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल नुकतेच आयोजिलेल्या शुभेच्छा समारंभात डिचोलकर बोलत होते. त्यांनी एम. पद्मनाथन यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृतीची काळजी घेण्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही निरोगी ठेऊन सतत आनंदी राहिले पाहिजे.

या कार्यक्रमाला दोस्ती एकर्स ज्येष्ठ नागरिक संघाचे मुकुंद सावंत, चतुर्वेदी, जेजुरीकर आदी उपस्थित होते. या वेळी पद्मनाथन यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply