Breaking News

रायगडात महामानवाचा जयजयकार!

जिल्हाधिकारी कार्यालयातही डॉ. आंबेडकरांना अभिवादन

अलिबाग : जिमाका

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी (दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरात बुधवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी अत्यंत साधेपणाने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे ज्येष्ठ कर्मचारी प्रयोगशाळा परिचर दत्ताराम यादव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित शेडगे यांनी केले. मुख्याध्यापक महादेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक प्रमुख मनोहर पुरी यांच्या नियोजनातून  कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत डॉ. आंबेडकर  जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्दतीने निबंध लेखन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  अभिवादन केले.

मुरुड : प्रतिनिधी

कोरोनामुळे या वर्षीही मुरूड तहसील कार्यालय व दरबार हॉलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची130 वी जयंती साध्या पद्दतीने साजरी करण्यात आली. तहसीलदार गमन गावित आणि पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार, कार्य आणि कर्तृत्वाने जगभरातील लोकांच्या मनावर  राज्य केले. त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढील पिढीने जाणणे, जपणे आणि पुढे नेणे आवश्यक आहे, असे मत तहसीलदार गमन गावित यांनी या वेळी व्यक्त केले. राजू भोय,पोलीस नाईक राहुल थळे, प्रविण बैकर, महेश मानकर, अभिजित पानवलकर, शैलेश माळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

कर्जत : प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी बुधवारी कर्जत नगर परिषद कार्यालयात अभिवादन केले. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, भाजपचे नेते दीपक बेहेरे, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, रविंद्र लाड, सुदाम म्हसे, लक्ष्मण माने, अशोक भालेराव, शेखर लोहकरे,  मंदार मेहेंदळे यांच्यासह कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply