Breaking News

पतंजली कमिटीकडून ऑनलाइन गुढीपाडवा

माणगाव : प्रतिनिधी

महिला पतंजली योग कमिटी दक्षिण रायगड यांच्या वतीने मंगळवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने गुढीपाडवा  साजरा करण्यात आला.

पतंजली योग पिठाच्या वतीने रामदेवबाबा यांच्या संकल्पनेतून गुढीपाडवा हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला पतंजली योग समिती दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा वैशाली जंगम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. होमहवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राज्य योगासन स्पर्धा विजेते विनायक जंगम यांनी होमहवनाला मंत्रोच्चारांची साथ दिली. वैशाली जंगम यांनी राष्ट्रीय महिला दिनाची पार्श्वभूमी सांगितली. अपूर्वा जंगम, कविता जंगम, अपूर्वा दाभोळकर, पल्लवी जंगम, संगिता निरणे, इंद्रजा जंगम यांनी महिला दिन तसेच योगासन व प्राणायाम यांचे महत्व सांगितले. या वेळी योगउखाण्यांचा कार्यक्रम झाला.

या ऑनलाइन कार्यक्रमात महाड, माणगाव, म्हसळा व तळा तालुक्यातील एकूण 25 महिला सहभागी झाल्या होत्या. अपूर्वा जंगम यांनी आभार मानले. सामूहिक शांतीपाठ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पेणमध्ये गुढीपाडवा साधेपणात साजरा

पेण : प्रतिनिधी

कोरोनाच्या निर्बंधामुळे पेणमध्ये मंगळवारी (दि. 13) गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दुसर्‍या वर्षीही नागरिकांना घरगुती वातावरणातच गुढीपाडवा साजरा करावा लागला. ढोल-ताशे, शोभायात्रा, मिरवणुका काढल्या गेल्या नाहीत.

कोरोना निर्बंधामुळे सराफी पेढ्या बंद असल्याने  दागिने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. केवळ आगाऊ बुकिंग केलेल्या 5 ते 10 टक्के ग्राहकांनी मंगळवारी वाहन खरेदी केली. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने- नाणे, वाहन खरेदीला होणारी गर्दी यावर्षी मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी झाली होती.

Check Also

अटल सेतूजवळ ‌‘शिवमुद्रा‌’ आणि ‌‘शिवस्मारक‌’ उभारणार; मंत्री आशिष शेलारांसमवेत आमदार महेश बालदींची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या अटल सेतूजवळ रायगडच्या दिशेला असलेल्या एका मोठ्या खडकावर भव्य …

Leave a Reply