Breaking News

रायगडातील पूरग्रस्तांना लायन्स क्लबचा मदतीचा हात

अलिबाग : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. 

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात दरडी कोसळल्या. त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेक घर कासळली. पूरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. लायन्स क्लब ऑफ अलिबाग, खोपोली, मांडवा, पोयनाड, पेण, कोलाड, रोहा, अलिबाग डायमन्ड तसेच लिओ क्लब अलिबाग, मुलूंड, पनवेल व महाड तर्फे महाड शहर, कोंडीवते, पोलादूर शहर, कळवणे, साखरसुतारवाडी तसेच प्रतापगड  येथील पुरग्रस्तांना सुमारे 25 लाख रूपयांच्या वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्यात 400 मॅट्रेस, 500 ब्लँकेट, 500 चटया, 1100 फिनेल बाटल्या, धान्याच्या 500 बॅगा, इतर  गृहोपयोगी वस्तुंचे 220 किट्स, 200 बादल्या तसेच नवीन कपड्यांचा समावेश होता.

महाड शहरातील पूरगस्त नागरिक तसेच पोलिसांना 9 ऑगस्ट रोजी वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या वेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल लुनकरन तावरी,  मनीष लडगे,  चेतन मेहता, विभागीय अध्यक्ष अरवींद घरत, झोन अध्यक्ष रवींद्र घरत, रोहा क्लब अध्यक्ष नुरूद्दीन रोहावाला आदी  उपस्थित होतेे. महेश चव्हाण व अनिल आगाशे यांनी संपूर्ण मदत वाटपाच्या कामात समन्वयक म्हणून काम पाहिले. नितीन म्हात्रे, किरण म्हात्रे, गिरीश पयेलकर यांनी मदत वाटपात सहकार्य केले. 

अलिबाग व मुरूड येथील डॉक्टर असोसिएशन व लायन्स कलब यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त गावांमध्ये दोन दिवसांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यात रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या वेळी प्रवीण सरनाईक, आनिल म्हात्रे, नयन कवळे यांनी आरोग्य शिबिरासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले. लायन्स क्लब ऑफ खोेपोली तर्फे औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply