Breaking News

भाजपचे अण्णा कंधारे यांच्यातर्फे आरोग्यविषयक साहित्याचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी

कोरोना काळात सक्रीय असणार्‍या मुरूडमधील सामाजिक संस्थांना भाजपचे ज्येष्ठनेते अण्णा कंधारे यांनी मास्क, सॅनिटायझर, पाण्याचा जार, वाफ घेण्याचे मशीन अशा वस्तूंचे वाटप केले. मुरूडमधील ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, श्रीराम पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, श्री काळभैरव पतसंस्था या ठिकाणी नागरिकांचे येणे-जाणे सतत सुरू असते. तेथील कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते कंधारे यांच्यामार्फत मास्क, सॅनिटायझर, पाण्याचा जार, वाफ घेण्याचे मशीन आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात डॉ. दिव्या सोनम, डॉ. शिवाली व्हावळ यांनी या वस्तू स्वीकारल्या. या वेळी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. भाजपचे मुरूड तालुका उपाध्यक्ष बाळा भगत, शहर अध्यक्ष उमेश माळी, शेगवाडा पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील, संदीप घरत, संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, केदार गद्रे, सुनील खेऊर, किशोर म्हसकर आदी या वेळी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त आहे, तेथील कर्मचार्‍यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी आम्ही जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक वस्तूंचे वाटप केले.

-अण्णा कंधारे, ज्येष्ठ नेते, भाजप, मुरूड

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply