नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जिथे वर्षानुवर्ष कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये गुंतवून ठेवणे ही प्रशासनाची ओळख होती, तोच भारत इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये मोठी झेप घेत आहेत. जिथे वर्षानुवर्ष कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जंजाळात गुंतवून ठेवले गेले, तिथे आज डझनावरी कायदे चार लेबर कोर्टमध्ये सामावले गेले आहेत. जिथे शेतीला फक्त गुजराण करण्याचे माध्यम मानले जात होते तिथे शेतीला परदेशी गुंतवणुकीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच जोरावर रेकॉर्ड ब्रेक परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ते भारतीय उद्योग संघटना म्हणजेच सीसीआयच्या वार्षिक बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
या वेळी देशातीली परिस्थिती आता उद्योगांसाठी कशी सुधारली आहे आणि उद्योगांनी या परिस्थितीचा कसा फायदा घ्यायला हवा हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारलेली प्रशासकीय व्यवस्था आणि कायद्यांचे झालेले सुसूत्रीकरण याचदेखील कौतुक केले. उद्योगांसाठी परकीय गुंतवणूक आणि लोकांची मानसिकता या गोष्टीही अनुकूल झाल्याचे त्यांनी नमूद केले.
एक काळ होता जेव्हा आपल्याला वाटत होते की जे काही परदेशी आहे तेच चांगले आहे. या मानसिकतेमुळे उद्योगांचे नुकसान झाले. आपण तयार केलेल्या ब्रँड्सलादेखील परदेशी नावांनीच विकले जात होते. आज प्रत्येक भारतीय भारतात बनलेली उत्पादनांना पसंती देत आहे. आता उद्योग विश्वाला यानुसार आपली रणनीती बनवायची आहे. इतक्या मोठ्या संकटातदेखील आपल्या स्टार्टअप्सनी हार मानलेली नाही. स्टार्टअपचे रेकॉर्ड लिस्टिंग भारतीय उद्योग विश्वासाठी नवी सुरुवात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Check Also
खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …