कर्जत : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन कर्जतमध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ झाला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी – ठाकूर, तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलीस उप विभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादिर, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, नायब तहसीलदार संजय भालेराव, सुधाकर राठोड, पुरषोत्तम थोरात, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, नगरसेविका पुष्पा दगडे, डॉ. ज्योती मेगाळ, भारती पालकर, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, संचिता पाटील, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे, नगरसेवक शरद लाड, विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, संकेत भासे, धनंजय दुर्गे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष रामकृष्ण मोकल, माजी नगरसेवक भालचंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते केतन जोशी, अरुण निघोजकर, महेंद्र चंदन, संदीप भोईर, अनंत निलधे, अभिजित मुधोळकर, सुरेखा प्रधान, मीना कुळकर्णी, कुंदा निघोजकर, सायली शहासने तसेच अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षक नंदकुमार मणेर, जयमाला जांभळे, भीमराव पगारे, सागर वाघेला आदींसह प्रांत, तहसील, नगर परिषद कार्यालयांचे कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 1 मे कामगार दिन साजरा केला जातो. यावेळी ध्वजस्तंभाजवळ सफाई कामगार अशोक रणदिवे व महिला सफाई कामगार चंदा जाधव यांना उभे राहण्याचा मान दिला. कर्जत नगर परिषदेच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनी कामगारांना हा बहुमान मिळाला आहे
कर्जतमधील बहुसंख्य शाळांमध्ये बुधवारी परीक्षांचे निकाल जाहीर होणाार होते, तत्पूर्वी या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.