कर्जत : बातमीदारमहाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त बुधवारी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच जान्हवी साळुंखे यांचे हस्ते झेंडा फडकविण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सरपंच सुवर्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार, अर्चना भालेराव, मीना पवार, अश्विनी पारधी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडदे, माजी उपसरपंच सुमन लोंगले, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय मनवे, जयवंत साळुंखे, मनसेचे शहर अध्यक्ष मिलिंद मिसाळ, मराठा समाजाचे पदाधिकारी चंद्रकांत मोरे, सुभाष नाईक, बाळू लोंगले, पोलीस पाटील गवळे यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
Check Also
पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper