अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनानिमित्त रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ज्या अधिकारी व कर्मचार्यांना पोलीस महासंचालक पदक, अंतरिक सुरक्षा पदक तसेच विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहेत, त्यांना पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांना विशेष सेवा पदक, खोपोलीचे पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांना आंतरिक सुरक्षा पदक, पेणचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांना पोलीस महासंचालकांचे पदक, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना पोलीस महासंचालकांचे पदक, कर्जतचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे यांना विशेष सेवा पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल वळसंग यांना विशेष सेवा पदक देऊन सन्मानीत करण्यात आले. राखीव पोलीस उपनिरीक्षक अजय शेवाळे यांना पोलीस महासंचालकांचे पदक, सहाय्यक फौजदार सुधीर शिंदे यांना पोलीस महासंचालकांचे पदक, सहायक फौजदार हर्षकांत पवार यांना पोलीस महासंचालकांचे पदक प्रदान करण्यात आले. पोलीस हवालदार राजेश चाळके यांना, त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक, पोलीस हवालदार बाबासाहेब लाड यांना पोलीस महासंचालकांचे पदक देऊन गौरविण्यात आले तर पोलीस नाईक बिपीन थळे यांचा पोलीस महासंचालकांचे पदक देऊन सन्मान करण्यात आला.