Breaking News

केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्या -अमर पाटील

कळंबोली : वार्ताहर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ई-श्रम सेवा सुरू केले आहे. या लाभदायक योजनेचा फायदा घेऊन आपण आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी बना, असे आवाहन नगरसेवक अमर पाटील यांनी केले.

मोदी सरकारच्या लाभदायक योजना जनतपर्यंत पोहचाव्या म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व गटनेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून ई-श्रम कार्ड, ई -श्रम महानोंदणी अभियान नगरसेवक बबन मुकादम व भाजपचे महिला नेत्या प्रिया मुकादम यांनी जनतेच्या सेवेत आणले आहे. त्यावेळी ते कळंबोली येथे अमर पाटील बोलत होते.

या वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचार्‍यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाईल, जे एक वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना येता यावा ही आमची भूमिका असून या उद्देशाने आम्ही या ई-श्रम महानोंदणी अभियान आपल्या दारी आणले आहे, असे नगरसेवक बबन मुकादम यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply