Breaking News

महिलांची बुलंद तोफ रविवारी खोपोलीत

महिला मेळाव्याला चित्रा वाघ करणार मार्गदर्शन

खोपोली ः प्रतिनिधी

उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने रविवारी (दि. 27) खोपोलीत महिला मेळावा होणार असून या मेळाव्याला महिलांची बुलंद तोफ असलेल्या भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. खोपोलीमधील लोहाणा समाजमंदिराच्या पटांगणात हा मेळावा सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी तसेच पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, खोपोली संपर्क प्रमुख सुनील घरत, विधानसभा संयोजक दीपक बेहेरे, महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी चारुशीला घरत आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम चित्रा वाघ सातत्याने करीत आहेत. त्यांच्या मौलिक मार्गदर्शनातून महिलांना मोठ्या प्रमाणात बळ मिळत असते. त्या अनुषंगाने हा मेळावा महिलांसाठी मार्गदर्शक असणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply