Breaking News

कळंबोली, खारघरमध्ये विकासपर्व

पनवेल महापालिकेकडून 22 कोटींच्या कामांना मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कळंबोली आणि खारघर येथील 22 कोटी रुपयांच्या विकासकामांना सोमवारी (दि. 22) महासभेत मंजुरी देण्यात आली. महापालिका स्थापन झाल्यापासून हस्तांतरणाअभावी सिडको नोडमधील कामे करता आली नव्हती. त्यामुळे सिडको नोडमधील कामांना पहिल्यांदाच मंजुरी देण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेची 18 मार्चची तहकूब सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी सकाळी 11.30 वाजता ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली. या वेळी सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त सांडभोर उपस्थित होते.
या सभेत पनवेल प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत येणार्‍या प्रभाग क्रमांक 4 येथील खारघर गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवणे, कळंबोली, खारघर येथील उद्याने व खेळाची मैदाने
विकसित करणे या विषयांना मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली येथे मिळकत क्रमांक 517 ब जागा महाराष्ट्र शासन, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पनवेल यांना भाड्याने देण्याबाबतचा विषय प्रभाग समिती ’ब’ सभापती समीर ठाकूर यांनी या ठिकाणी महापालिकेची एखादी वास्तू किंवा आरोग्य केंद्र होऊ शकते का याची पडताळणी करावी, अशी मागणी केल्याने स्थगित ठेवण्यात आला.

पनवेल प्रभाग समिती ‘अ’मधील प्रभाग क्रमांक 4 खारघर गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवणे-11,38,12,766 रुपये. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे

  •  पाणीपुरवठा : यामध्ये उंच जलकुंभ (क्षमता पाच लाख लिटर) व विद्युत व्यवस्था ः 2,86,39,227  रुपये
  •  मलनिस्सारण ः वाहिन्या जोडणे 1,65,02,169 रुपये
  • रस्ते ः 2,18,14,272 रुपये
  •  पावसाळी गटारे ः 2,05,06,534 रुपये
  •  विद्युत वाहिन्या कमी दाबाच्या भूमिगत करणे ः 2,63,50,563 रुपये
  •  कळंबोली, खारघर येथील उद्याने व खेळाची मैदाने विकसित करणे खर्च ः 2,201 लाख रुपये

महाराष्ट्रात ज्या महाविकास आघाडीचे सरकार आहे त्या सरकारने कोरोनामुळे दिलेल्या नियमवालीप्रमाणे महापालिकेची महासभा घेण्यात येत असताना सरकारचे नियम महापालिकेतील विरोधी सदस्यांनी पायदळी तुडविले. त्याचा मी निषेध करीत आहे. लग्नसोहळा, कार्यक्रमांना 50 माणसांचे बंधन आहे. त्याचे पालन आम्ही करीत असताना, सभागृहात येऊन सरकारचा अपमान करण्याचे काम महाविकास आघाडीच्या येथील नगरसेवकांनी केले आहे. हे निंदनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची उपमहापौर म्हणून माझी मागणी आहे.
-जगदिश गायकवाड, उपमहापौर

Check Also

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी …

Leave a Reply