अलिबाग, खोपोली : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्यापैकी रायगड जिल्ह्यातील आर्यन राजेंद्र पाटील (पेण), पूर्वा पराग पाटील (अलिबाग), सलवा मोहम्मद सलीम धनसे (खोपोली), प्रचिती दीपक पवार (पनवेल) हे चार विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले.
रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या युध्द परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.
रायगड जिल्हा प्रशासन युक्रेनमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील विद्यर्थ्यांच्या पालकांशी संपर्क ठेवून आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून माहिती घेतली जात आहे. ही माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली जात आहे. ती भारत सरकारकडे माहिती पाठवत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या देशात परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.
युद्ध सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेपर्यंत पोहचणे कठीण बनले आहे. काही विद्यर्थी 50 किलोमीटरचा पायी प्रवास करून शेजारच्या रोमानिया देशात पोहचले आहेत. जे विद्यार्थी रोमानियात पोहचले आहेत त्यांना लवकरच भारतात आणले जाईल, असे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.
खोपालीतील सलवा हि मंगळवारी सुखरूप घरी पोहचली. युक्रेनमधील परिस्थिती भयानक असून चौदा ते पंधरा किलोमीटर पायपीट करत तीस किलो सामानासाठी विमानतळ गाठावे लागल्याचे सलवा हिने सांगितले. केंद्र शासनाने वेळीच खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोदी सरकारचे आभार मानण्यात येत आहे. आपले पाल्य सुखरूप आल्याबद्दल कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …