पनवेल : रामप्रहर वृत्त
केदार भगत मित्रपरिवार या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील 21 महिलांचा सत्कार, हळदी-कुंकू समारंभ आणि चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 6 मार्च) करण्यात आले आहे. व्हि. के. हायस्कूलच्या मागील मैदानावर होणार्या या समारंभास पनवेलमधील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शकुंतला रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप महाराष्ट्र सदस्य श्रीनंद पटवर्धन, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महापौर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा रत्नाताई घरत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी लकी ड्रॉ, 3 पैठणी साड्या आणि 51 आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी नितेश भगत 9594768143, भावेश शिंदे 8779977491, संकेत दसवते 9920530143, संतोष वर्तळे 9967052424 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भाजप युवा नेते केदार भगत यांनी केले आहे.