Breaking News

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार असून, नव्या स्वरूपातील आकर्षक व सुंदर इमारत लवकरच पाहायला मिळेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी गुरुवारी (दि. 21) दिली.

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी दुपारी अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनात झाली. या सभेस सभागृह नेते परेश ठाकूर, तेजस कांडपिळे, सीता पाटील, वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, आरती नवघरे, विरोधी पक्षाच्या हेमलता गोवारी उपस्थित होते. या सभेत महापालिका मुख्यालय इमारतीच्या बाह्यरूप सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या कामासाठी आलेल्या पाच निविदांपैकी मे. महेश साळुंखे यांची 15% कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. या सभेत शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये रोडपाली, कामोठे, खिडूकपाडा, घोट, पडघे, आसूडगाव, पेंधर, धरणा कॅम्प आणि भोईरपाडा या ग्रामीण भागातील शौचालयांचा समावेश आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील कार्यालये, शाळा, भाजी मार्केट, उद्याने, नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आरोग्य बुथ येथील विद्युत निगा राखण्याची आणि पथदिव्यांच्या दुरुस्ती कामासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. पटलावरील 17 ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शेवटचा ठराव स्थगित ठेवण्यात आला आहे. याबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply