पनवेल ः प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 21 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आणखी 10 दिवसांनी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात शुक्रवारी (दि. 11) झालेल्या सुनावणीत सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. वेनेगावकर, अॅड. सुनील गोन्साल्वीस, ईडीचे असिस्टंट डायरेक्टर प्रेमसिंग मिना उपस्थित होते. विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. राहुल ठाकूर उपस्थित होते. सुनावणीच्या वेळी ‘ईडी’तर्फे अॅड. वेनेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील विवेक पाटील यांची बाजू ऐकण्यासाठी त्यांचे वकील अॅड. राहुल ठाकूर यांना आणखी 10 दिवसांची मुदत दिली आहे. पुढील सुनावणी आता 21 मार्चला होणार आहे.