Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा ‘तुंबई’ नाट्यप्रयोग राज्यस्तरीय स्पर्धेत सादर

ठाणे ः प्रतिनिधी

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा ‘तुंबई’ हा नाट्यप्रयोग 60व्या राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी (दि. 10) सादर झाला. त्यास रसिकांनी दाद दिली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मार्गदर्शन कला क्षेत्राला सातत्याने मिळत असते. त्या अनुषंगाने ‘तुंबई’ या नाटकाचे सादरीकरण राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत झाले. ‘तुंबई’चे लेखक चैतन्य सरदेशपांडे, दिग्दर्शक गणेश जगताप असून प्रकाश योजना श्याम चव्हाण यांची, नेपथ्य व संगीत कलादर्पण संस्थेचे, गीत गणेश जगताप, सूत्रधार अभिषेक पटवर्धन, तर रंगमंच व्यवस्था टीम अटल करंडकने पाहिली. अभिजित झुंजारराव व प्रफुल गुरव यांचे सहकार्य लाभले. या प्रयोगास अमोल खेर व शामनाथ पुंडे उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply