मोहोपाडा : प्रतिनिधी
रोटरी क्लब पाताळगंगा तर्फे एमआयडीसी टेकडीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या कचरा गोळा करण्यात आला.
पर्यावरण डायरेक्टर सुनील भोसले यांच्या संकल्पनेतून व सर्विस डायरेक्टर वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरात एमआयडीसी टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो, पण तोच परिसर काही लोकांमुळे अस्वच्छ राहणे फार दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंत रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश काळे यांनी व्यक्त केली. यापुढे असे घडू नये व टेकडी परिसर स्वच्छ ठेवण्याचे साईन बोर्ड लावण्यात आले.
या उपक्रमासाठी अध्यक्ष गणेश काळे, सेक्रेटरी संदीप साबळे, सहाय्यक सेक्रेटरी देवेंद्र महिंद्रकर, ऋतुजा भोसले, होनावळे, राजू गायकवाड, गणेश म्हात्रे, अनूराधा होनावळे, शर्विन भोसले यांची उपस्थिती लाभली. एमआयडीसी अभियंता रामाकृष्ण एम राजू व कर्मचारी यांचे योग्य सहकार्य मिळाले. विषेश सहकार्य विजय पाटील यांचे लाभले.
रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा यांच्यावतीने रसायनी परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रोटरी क्लब नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.