दै. किल्ले रायगडचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल येथील सर्वांत जुने वर्तमानपत्र असलेल्या दैनिक किल्ले रायगडने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आता वेब पोर्टल, यू ट्यूब, फेसबुक व ट्विटर पेज सुरू करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल किल्ले रायगडचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत

शुभारंभ झाला.

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले, तर ट्विटर आणि फेसबुक पेजचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी क्लिक करून यू ट्यूब चॅनलचे उद्घाटन केले. संपादक प्रमोद वालेकर यांनी या वेळी दै. किल्ले रायगडच्या वाटचालीचा आढावा घेतला. डिजिटल क्षेत्रात पाऊल

टाकण्यामागचा उद्देश त्यांनी विशद केला. डिजिटल किल्ले रायगडमध्ये चालू घडामोडींपासून मनोरंजन, आरोग्य, कथा, कविता अशा अनेक विषयांवर माहिती प्रसारित होणार असल्याचेही वालेकर यांनी सांगितले. डिजिटल किल्ले रायगडच्या कार्यकारी संपादक ऋतुजा वालेकर-तटकरी यांनी उपस्थितांचे समयोचित शब्दांत आभार मानले.

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे दैनिक ः आमदार प्रशांत ठाकूर

ल. पां. वालेकर यांनी सुरू केलेल्या दैनिक किल्ले रायगडने आजपर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केले आहे. वालेकरकाकांचा वारसा आता त्यांची तिसरी पिढी चालवत असल्याबद्दल मनोमन समाधान वाटत आहे. एकेकाळी किल्ले रायगडची छपाई ही खिळे लावून केली जात असे. त्या वेळी उमेश मानकामे आणि मी या ठिकाणी येऊन ते पाहत असत. त्यानंतर ऑफसेट आणि आता डिजिटल असा मोठा बदल दैनिक किल्ले रायगडमध्ये झाला आहे. जी वस्तुस्थिती आहे, ती मांडणे ही या दैनिकाची परंपरा आहे, अशा शब्दांत आमदार प्रशांत ठाकूर यांनी दैनिकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

वर्तमानपत्र आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहे. अवतीभोवती समाजात काय घडते हे सर्वकाही बातमीच्या माध्यमातून सर्वांना समजते. दिवसेंदिवस या माध्यमांत बदल घडत चालले आहेत. सध्याचे युग डिजिटल असल्याने काही क्षणातच आपल्याला घडामोडी समजतात. गेल्या एक-दोन महिन्यांत डिजिटल माध्यमांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. दैनिक किल्ले रायगडला मोठी परंपरा आहे. आज त्यांनीसुद्धा डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल सर्व किल्ले रायगड परिवाराला मनापासून शुभेच्छा.

-डॉ. कविता चौतमोल, महापौर, पमपा

दैनिक किल्ले रायगड हे पनवेलमधील सर्वांत जुने वर्तमानपत्र आहे. काळानुरूप या वर्तमानपत्रामध्ये मोठे बदल घडत गेले. त्यांनी वेब पोर्टलसह फेसबुक, ट्विटर आणि यू ट्यूब चॅनल सुरू केले. या माध्यमातून पनवेलकरांना ताज्या घडामोडींचे अत्यंत जलद अपडेट मिळतील. डिजिटल किल्ले रायगडला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका

Check Also

Genau so wie konnte gentleman hundred Freispiele abzuglich Einzahlung as part of Gemein… Casinos gebrauchen?

Obwohl ein winzig luckenlosen Nutzbarkeit solltest du unser Leistungsnachweis via dein Spielverhalten asservieren Selbige vergutungsfrei …

Leave a Reply