Breaking News

नवी जर्सी, नवा जोश!; मुंबई इंडियन्सचे खास फोटोशूट

चेन्नई ः वृत्तसंस्था

आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने 9 एप्रिलपासून आयपीएलला प्रारंभ होणार आहे. सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघ चेन्नईत दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्स ट्विटरवरुन खेळांडूसंबंधी अपडेट देत फोटो शेअर करीत असते. या वेळी त्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे फोटोशूट शेअर केले. यामध्ये खेळाडू नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत. मुंबई इंडियन्सने नुकतेच या जर्सीचे अनावरण केले होते. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरून या जर्सीचा व्ह़िडिओ शेअर करण्यात आला होता. मुंबईने नव्या जर्सीत रंगांच्या बाबतीत काही बदल आहेत. निळा आणि सोनेरी छटा असलेली ही जर्सी चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मागील हंगामात त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवले होते. इतर कोणतीही संघ त्यांची बरोबरी करू शकलेला नाही. 

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply