Breaking News

मुरूडमध्ये भाजपतर्फे रविवारी भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील हिंदू बोर्डिंग येथील भव्य पटांगणावर भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी (दि. 13) सायंकाळी 6.30 वाजता शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तीन वेळा मिस्टर इंडिया व सहा वेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावणारा शरीरसौष्ठवपटू सुनील जाधव मुख्य आकर्षण असणार आहे. या स्पर्धेस भाजप प्रदेश सरचिटणीस व कोकण विभाग प्रमुख आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रमुख प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत जिल्ह्यातील नामंकित शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीराचे प्रदर्शन करणार असून अंतिम विजेत्यास भाजप श्री किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात युवा शरीरसौष्ठवपटू उदयास येत आहेत. त्यांना मुरूडमधील या भव्य स्पर्धेत आपल्या पीळदार शरीराचे प्रदर्शन दर्शकांसमोर करता येईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक व भाजप मुरूड तालुका उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांनी सांगितले की, आजच्या तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी आपल्या शरीराचे संवर्धन करावे यासाठी भाजपतर्फे या स्पर्धेचे खास आयोजन करण्यात आले आहे. माझ्यावर नुकतीच तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात विविध उपक्रमांचे आयोजन करून पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार असल्याचे आहे. शरीरसौष्ठव स्पर्धा रंगतदार होणार असून जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही किल्लेकर यांनी केले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply