Breaking News

पनवेल स्टेशनमधील शौचालय प्रवाशांसाठी खुले

नवीन पनवेल बाजूलाही सुविधा; नागरिकांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल रेल्वे स्टेशनवर लोकलच्या फलाट क्रमांक 4 समोर आमदार प्रशांत ठाकुर यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेले शौचालय बुधवारपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. यामुळे नवीन पनवेलकडे जाणार्‍या प्रवाशांची सोय झाली असून अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाची ही दुर्गंधी पासून सुटका होणार आहे.

पनवेल रेल्वे स्टेशनवर पूर्व बाजूला (नवीन पनवेल) शौचालय नसल्याने दीड-दोन तास प्रवास करून येऊन पुढे जाणार्‍या प्रवाशांचे खूप हाल होत होते. महिला, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होत होता. याबाबत स्टेशन सल्लागार समितीने अनेक वेळा पूर्व बाजूला शौचालय बांधण्याची मागणी केली होती. नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कट्ट्याच्या बाजूला अनेक प्रवाशी नाईलाजाने आपला कार्यभाग उरकून घेत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ही त्रास होत होता. याबाबत त्यांनी रेल्वेकडे शौचालय बांधण्याची मागणी अनेकवेळा केली होती. परंतु रेल्वे प्रशासन नवीन स्टेशनचे बांधकाम झाल्यावर त्यामध्ये शौचालय असेल असे उत्तर देत होते. त्यामूळे रेल्वे सल्लागार समिती आणि अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले. त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केल्यावर फलाट क्रमांक 4 समोर नवीन बांधण्यात आलेल्या जिन्याच्या मागे नवीन शौचालया बांधण्यात आले. बुधवार 4 डिसेंबर रोजी हे शौचालय प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक नायर यांनी दिली.

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला शौचालय बांधावे अशी आमची अनेक दिवसांपासून मागणी होती. शौचालयची सोय नसल्याने लोकलमधून येणारा प्रवाशी आमच्या कट्ट्याच्या मागील भागाचा वापर शौचालयासारखा करीत त्यामुळे येथे दुर्गंधी येत असे. त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर ही झाला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे स्टेशनवर शौचालय सुरू झाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे, त्यांना मी संघाच्या वतीने धन्यवाद देतो.

-प्रकाश विचारे, अध्यक्ष, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply