Breaking News

अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान -रवी शास्त्री

अलिबाग : प्रतिनिधी

30 वर्षांपूर्वी मी अलिबागला आलो. इथे स्थायिक झालो. इथे येऊन मला जी शांतता मिळते ती जगात कुठेच मिळत नाही. अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ते कणकेश्वर फाटा येथे सुशोभीकरण सोहळ्यात बोलत होते. अलिबाग-मांडवा रस्त्यावरील कणकेश्वर फाटा परिसराचा सुशोभिकरणाचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. 12) झाला. त्या वेळी शास्त्री प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. समिरा उद्योग समुहाकडून या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या फाट्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रवी शास्त्री असे नाव देण्यात आले. भारतीय संघात खेळत असताना मी 1992मध्ये मी अलिबागला आलो. आवास- सासवणे परिसरात जागा घेतली. तिथेच स्थायिक झालो. या 30 वर्षांत मला अलिबागने जी शातंता दिली, प्रेम दिले ते जगात कुठेच नाही मिळाले, असे उद्गार शास्त्री यांनी काढले. जेव्हा टीम चांगले काम करते तेव्हा लोकांचे प्रेम मिळते, पण जेव्हा ती हरते तर लोक रागही व्यक्त करतात. असा ताण, तणाव, निराशा दूर करण्याचे काम अलिबाग करते. त्यामुळे अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अलिबागमध्ये चांगले खेळाडू आहेत, जे आयपीएल, रणजीत तसेच देशाच्या संघातही स्थान मिळवू शकतात, पण त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, संधी मिळायला हवी, असे मत शास्त्री यांनी या वेळी व्यक्त केले. स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply