Breaking News

समाजप्रबोधन करताना अध्यात्मासह आधुनिक तंत्रज्ञानाचीही गरज

हभप भिकाजी महाराज यांचे प्रतिपादन

मोहोपाडा ः प्रतिनिधी

समाजाची सेवा करताना, शिक्षणाला आध्यात्मिक व वैज्ञानिक शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे, तरच शाश्वत विकास होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार, भगवान श्रीसद्गुरू गणेशयोगीराज महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप भिकाजी महाराज कदम यांनी केले. खालापूर तालुक्यातील राजिप प्राथमिक शाळा वावंढळ येथे भगवान श्रीसद्गुरू गणेश योगिराज महाराज वारकरी संस्थेच्या वतीने शाळेला तीन स्मार्ट टीव्ही, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव हभप सुभाष सावंत यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शैक्षणिक प्रगती झाली तरच देश विकासाच्या मार्गावर दिसेल. कोरोना काळात पंतप्रधान निधी व मुख्यमंत्री निधीला या संस्थेने भरघोस मदत केली आहे. तर कोरोना काळात ग्रामीण भागात मास्क, सॅनिटायझर वाटप, आर्थिक मदत केली असून व्यसनमुक्ती व स्वच्छता मोहिमेसाठी गावोगावी भ्रमणदिंडी काढली जाते, आतापर्यंत 120 भ्रमण दिंड्या काढण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप रामचंद्र महाराज होते. शाळा डिजिटल करताना व शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी देखील मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. कार्यक्रमास हभप बळीराम कदम, ज्येष्ठ नागरिक शिवरामराव कदम, हभप पांडुरंग कदम, दत्ताजी कदम, परशुराम कदम, शाळा समिती अध्यक्ष पवार, मुख्याध्यापक बाविस्कर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply