पनवेल ः वार्ताहर
तालुक्यातील बालाजी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स, कल्पवृक्ष सोसायटी, समृद्धी सोसायटी व ग्रीनवूड फेज 2 या सोसायटींमधील रहिवाश्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीद्र दौंडकर, वावंजे पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका अंधारे, कल्पवृक्ष व बालाजी सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील यांनी सोसायटीतील रहिवाशांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला सोसायटीतील रहिवाशांनी प्रतिसाद दिला. तसेच सर्व कमिटी अध्यक्ष व सहकारी आणि सर्व रहिवाशांनी एकत्रित राहून प्रशासनाला सहकार्य करू, अशी हमी दिली. या सभेमध्ये रहिवाशांच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत विस्तृतपणे संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांना काही मदत लागल्यास हेल्पलाईन नंबर 1058 वर संपर्क साधता येईल, याबाबतही माहिती दिली. तसेच या 5 सोसायटीत लवकरात लवकर एमआयडीसीचे पाणी यावे, घंटागाडी सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सुनील पाटील असे सांगितले. यासाठी सर्व सोसायटीतील रहिवाशांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन केले व सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबाबत आभार व्यक्त केले. तसेच इतर काही प्रश्न असतील तर त्याचा पाठपुरावा करीत आहोत, असे सांगितले.