Breaking News

नवीन पनवेलमध्ये राजस्थानी महिलांकडून दशामाता दिन

पनवेल ः प्रतिनिधी

राजस्थानी महिलांनी रविवारी नवीन पनवेलमधील विचुंबे पुलाजवळ असलेल्या पिंपळाची पूजा करून त्याला दोरा गुंडाळून दशामाता दिन साजरा केला. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमीला बिहार आणि राजस्थानमध्ये दशामाता पूजा केली जाते. दहाव्या दिवशी  महिला पारंपरिक पोशाख करून पिंपळा समोर पतवाढीची पूजा करतात. नंतर पिंपळाला सात प्रदक्षिणा मारून त्याला दोरा गुंडाळतात आणि प्रार्थना करतात त्यानंतर ही पूजा समाप्त होते. आपल्या कुटुंबाची बिघडलेली दशा चांगली व्हावी यासाठी बिहार आणि राजस्थानमध्ये होळीच्या दिवसापासून दहा दिवस दशमाता पूजा केली जाते. या दिवसात त्यांच्यापैकी एकाच्या घरी दशामातेची स्थापना केली जाते. महिला एकत्र जमून देवीची गाणी म्हणतात. या दहा दिवसांत एक वेळ जेवून उपवास करतात.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply