Breaking News

विनोद घोसाळकर यांचा अर्ज दाखल ; श्रीवर्धनमध्ये शिवसेना, भाजप महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

श्रीवर्धन, म्हसळा : प्रतिनिधी

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी (दि. 3) आपला उमेदवारी अर्ज श्रीवर्धन विधान मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे दाखल केला. तत्पूर्वी महायुतीने श्रीवर्धनमध्ये  जोरदार शक्तिप्रदर्शन केले.  

गुरुवारी सकाळी उमेदवार विनोद घोसाळकर यांनी शहरातील सोमजाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पटांगणापासून  महायुतीच्या कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन नगर परिषद कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्या कार्यालयात विनोद घोसाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार भरत गोगावले, माजी आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख रवी मुंडे, बाळशेठ लोखंडे, अ‍ॅड. राजीव साबळे, अ‍ॅड. मानकर, वैभवी घोसाळकर, प्रतोश कोळथरकर, राजू चव्हाण आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply