विविध कार्यक्रमांमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड सेक्टर 17 येथे श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
श्रीराम नवमीनिमित्त भारती सामाजिक संस्थेच्या वतीनेभव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला रविवारी सकाळी 10.30 वाजता रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथून सुरूवात झाली. बाईक रॅली पूर्ण उलवे नोडमध्ये फिरून शिवाजीनगर येथे मंदिरात पोहचली. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता हनुमान मंदिराचे ध्वजपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, उषा देशमुख, कामिनी कोळी, किशोर पाटील, वितेश म्हात्रे, सुधीर ठाकूर, अवधेश महतो, मोर्या सिंग, शेखर, काशिद, आशिष घरत, भाऊ भोईर, भाजप महिला मोर्चा उलवे नोड उपाध्यक्ष सुजाता पाटील आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भारतीय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित बाइक रॅलीमध्ये संस्थेचे अध्यक्ष अवधेश कुमार महतो, उपाध्यक्ष विकास सिंह, राजकुमार सिंह, सचिव मनोज कुमार मौर्या, उपसचिव गौतम कुमार, सुभाष पांडे, कोषाध्यक्ष अनिमेष कुमार, राजीव रंजन, अॅड. सुनील मौर्या, जवाहरलाल चौहान आणि संस्थेचे सदस्य जय प्रकाश सोनी, संदीप सावंत, मनोज जांगिड, राधे कृष्णा पाठक, आशीष शर्मा, विजय शंकर सिंह, गुलाब सिंह आदी उपस्थित होते.