Breaking News

नवीन पनवेल पोलीस चौकीची दुरवस्था

चौकीच्या बाहेर खूर्ची टाकून बसण्याची वेळ

पनवेल ः वार्ताहर

नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्सजवळील पोलीस चौकीची दुरवस्था झाली आहे. चौकीतील भिंतीना तडे गेले असून चौकीत सर्व वस्तू अस्ताव्यस्तपणे पसरल्या आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणार्‍या पोलिसांनाच बसायला जागा नाही. त्यामुळे चौकीच्या बाहेर खूर्ची टाकून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्सच्या पोलीस चौकीची अतिशय दुरवस्था झालेली असून ठिकठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. या पोलीस चौकीचा उद्घाटन समारंभ 2 ऑक्टोबर 2006 रोजी नवी मुंबई परिमंडळ दोनचे तत्कालीन पोलीस उपायक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते झाले होते. मात्र सद्यस्थितीत या पोलीस चौकीची अवस्था दयनीय झाली आहे. चिपळे, विहिघर, आकुर्ली, सुकापूर आदी गावे या पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात येतात, मात्र चौकीची अवस्था पाहून पुन्हा या चौकीत येत नसल्याचे अनेक नागरिक सांगतात.

चौकीतील खिडकी, काचा फुटलेल्या आहेत. तर कागदपत्रेही जळाली आहेत. येथील पत्रेदेखील फुटुन खाली पडले आहेत. सर्व सामान अस्तव्यासत्व पडलेले दिसून येते. त्यामुळे येथे पोलिसांनाच बसायला जागा नाही. यापूर्वी येथे याठिकाणी एक उपनिरीक्षक आणि तीन-चार पोलीस कर्मचारी काम करीत असत.  पावसाळा काही महिन्यांवर आला आहे, त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याआधी या चौकीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply