पनवेल : प्रतिनिधी
पनवेल येथील दोनशे पेक्षा जास्त वर्ष पुरातन असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रविवारी (दि. 10) रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना निर्बंध उठल्यानंतर होणार्या या कार्यक्रमाला ग्लोबल कायस्थ कॉन्फेरन्सचे सदस्य ही उपस्थित होते
श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे चांद्रसेनिय कायस्थ समाजाचे म्हणून ओळखले जाते. या पुरातन मंदिराचा 1936 मध्ये जिर्णोध्दार झाल्याचे पुरावे मिळतात. सन 1953 मध्ये सीकेपी समाजाने या ट्रस्टची नोंदणी करण्यात आली. उद्योगपती राजू गुप्ते यांनी मातोश्री श्रीमती कांता गुप्ते यांच्या इच्छेप्रमाणे मंदिराचा सन 2020 मध्ये जीर्णोद्धार केला. आज श्री लक्ष्मीनारायणाचे सुंदर मंदिर पनवेलच्या सौंदर्यात भर घालीत आहे. मंदिरात समाजाच्या ट्रस्ट तर्फे रविवार रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
आठवडाभरा पासून रोज संध्याकाळी मंदिरात भाविक रामरक्षा पठण करीत होते. रविवारी सकाळी ही समाजातील महिलांचे भजन झाले. त्यानंतर सजवलेल्या पाळण्यात श्री रामाची मूर्ति ठेवून वैशाली कुळकर्ण, वैशाली वैद्य, नीलिमा वैद्य, उज्वला गडकरी, प्रतिभा हजरनीस, सानिका पत्की व गौरी राजे यांनी पाळणा म्हटला त्यानंतर सुंठवडा वाटण्यात आला. शेवटी महाप्रसाद झाला
या कार्यक्रमाला ग्लोबल कायस्थ कॉन्फ्रेंसच्या रुचिता सिन्हा, विजय सिन्हा, नवीन कुमार, उद्योजक राजू गुप्ते, प्रदीप गुप्ते, राजा गुप्ते व डॉ. पुष्कर लिखिते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष योगेश राजे, सचिव गिरीश गडकरी, सहसचिव संदीप देशमुख, खजिनदार श्रीकृष्ण चित्रे, महेश कर्णिक व मिलिंद देशपांडे यांनी मेहनत घेतली.