आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही
नागोठणे : प्रतिनिधी
आपण आमदार असेपर्यंत नागोठणे गावातील विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही. या गावाच्या विकासाबाबत कुठेही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 21) नागोठणे येथे दिली.
स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा गुरुवार 21 एप्रिल रोजी सायंकाळी माजी मंत्री आमदार रवी शेठ पाटील यांच्या शुभहस्ते शिवसेना नेते रा जि प सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली
स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत नागोठणे शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाले. त्यानंतर भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार रविशेठ पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. वीस वर्षे प्रलंबित असलेला नागोठण्याच्या शुध्द पाण्याचा प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले. माजी सभापती मारुती देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. मनिषा कुंटे, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, मीनाक्षी गोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, शहराध्यक्ष सचिन मोदी, उपाध्यक्ष गौतम जैन, ज्येष्ठ कार्यकर्ते सिराज पानसरे, भाई पानसरे, शामकांत नेरपगार, विवेक रावकर, सुभाष पाटील, पिगोंडे ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेंद्र लवटे, विठोबा माळी, शेखर गोळे, मोरेश्वर म्हात्रे, शिवसेना शाखाप्रमुख धनंजय जगताप, अनिल महाडिक, संजय नांगरे, भाजपच्या महिला पदाधिकारी माधुरी रावकर, प्रियंका पिंपळे, मुग्धा गडकरी, शीतल नांगरे, सुखदा वढावकर, सोनाली पडवळ आदींसह भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड यांनी आभार मानले.