- शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये
- मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मंगळवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते त्यांना पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत केले.
या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्यासह चंद्रकांत घरत, पंडित घरत, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोईर तसेच प्रसाद भोईर, राजू भोईर, हेमंत भोईर, चाणजे ग्रामपंचायत सदस्य प्रीतम पाटील, सागर वाघमारे, फराज शेख, सोमनाथ आटपाटकर, अजय म्हात्रे, भाताण ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, युवा कार्यकर्ते अनिल भोईर, सुमित मुकादम आदी उपस्थित होते.
या वेळी युवक काँग्रेसचे उरण तालुका कैलास भोईर, चाणजे ग्रामपंचायतीच्या सदस्य किंजल कैलास भोईर, माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक जनार्दन रामचंद्र म्हात्रे व त्यांचे मित्र मंडळ यांनी शिवसेनेतून त्याचबरोबर भाताण गावातील काँग्रेसचे अनंत सते, मारूती म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.