खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथे भाजप पदाधिकार्यांच्या नियुक्त्या सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आल्या. या वेळी नियुक्तीपत्रे देऊन सर्वांचा विशेष गौरव केला. या कार्यक्रमाला प्रभाग समिती (अ) सभापती अभिमन्यूशेठ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेशजी पटेल, माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक समशेरसिंह जाखड, सभापती लीना गरड, नगरसेवक प्रवीण पाटील, नीलेश बाविस्कर, अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, किरण पाटील, उपाध्यक्ष मामा मांजरेकर, दिलीप जाधव, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, मोना अडवाणी, जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम, तालुका सहकार सेल संयोजक रवींद्र श्रीवास्तव, गुरुनाथ म्हात्रे, विपुल चौतालिया, अजय माळी, अशोक पवार, सीमा खडसे, कांचन बिर्ला, नरेंद्र रेड्डी, उमेश चव्हाण, मोहन भुजवडकर, विश्वनाथ इंडी, साम्या पावसकर, बलराम यादव, रण सिंग, हेतराम, राजबिर सिंग धंडा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पुढील नियुक्त्या करण्यात आल्या गजेंद्र सिंह सेना खारघर शहर माजी सैनिक सेल संयोजक, योगिता कडू महिला मोर्चा उपाध्यक्षा, अनिता जाधव महिला मोर्चा उपाध्यक्षा, नीलम विसपुते सांस्कृतिक सेल संयोजक, वैशाली प्रजापती अध्यक्षा सेक्टर 13 महिला मोर्चा, गजानन इंदुलकर अध्यक्ष सेक्टर 4, राजा राधाकृष्णन साऊथ सेल सदस्य, प्रभाकर चिदुराला साऊथ सेल सदस्य, रंजना जाखड सोशल मीडिया सदस्य, अशोक जांगीड सोशल मीडिया सदस्य, श्री रवींद्रन नायर अध्यक्ष साऊथ सेल, क्षमा राव साऊथ सेल सदस्य, रोहित शेट्टी साऊथ सेल सदस्य, नवनीत मारू ज्येष्ठ नागरिक खारघर शहर अध्यक्ष, अंबालाल पटेल व्यापारी सेल खारघर शहर अध्यक्ष, नंदकिशोर दळवी सेक्टर 20 उपाध्यक्ष. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे व प्रास्ताविक ब्रिजेश पटेल यांनी केले; तर आभार समशेर सिंह जाखड यांनी मानले.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …