खारघर : रामप्रहर वृत्त
माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना खारघर भाजप जनसंपर्क कार्यालयात नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अभिवादन केले.थोर कवी, पत्रकार, वाङ्मयाचे अभ्यासक अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन या वेळी करण्यात आले. मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी त्यांचे जीवनचरित्र उलगडून सांगितले.
या वेळी खारघर मंडलाध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, अॅड. नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका अनिता वासुदेव पाटील, संजना कदम, नेत्रा पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, रमेश खडकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजिका मोना अडवाणी, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, शिक्षक सेल अध्यक्ष प्रो. संदीप रेड्डी, मंडल चिटणीस अनिता जाधव, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, जिल्हा सरचिटणीस समीर कदम, प्रभाग 4 अध्यक्ष वासुदेव पाटील, युवा सरचिटणीस अमर उपाध्याय, गुरुनाथ म्हात्रे, विपुल चौतालिया, हंसा पारधी, रूपेश चव्हाण, ज्येष्ठ नागरिक सेल संयोजक नवनीत मारू, सुशीला शर्मा, निर्मला यादव, भाजप माथाडी कामगार युनियन प्रदेश सचिव अनिल खोपडे, सुशांत पाटोळे, सर्जेराव मेंगाने, प्रभाकर जोशी, विजय बागडे, सुनंदा देसाई, शालिनी सिन्हा, नारायणभाई घाडीया, शिवम सिंग, ज्ञानेश्वर खारपुरीया आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शिंदे यांनी, तर आभार संदीप रेड्डी यांनी मानले.